मुंबई । झुंजार न्यूज
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत, सरकार दर महिन्याला सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे बीपीएल कुटुंबांना मोफत धान्य पुरवते. यासाठी रेशनकार्डमध्ये ज्यांची नावे आहेत, त्या सर्वांचे आधार सीडिंग करणे आवश्यक असल्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
याबाबत शासनाकडून गेल्या महिनाभरापासून सूचना देण्यात येत आहेत. असे असूनही, अद्यापही जिल्ह्यातील १,८४,०५१ लोकांना आधार सीडिंग करून घेता आलेले नाही, तर त्यांच्या वितरण प्रणाली विक्रेत्याकडे आधार सीडिंग मोफत करता येते.
शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे
ज्यांनी अद्याप आधार लिंक केलेले नाही त्यांना रेशन मिळणार नाही. सरकारने सहाव्यांदा आधार लिंकिंगची तारीख वाढवली असल्याचे सांगण्यात येत आहे. आता कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपर्यंत आधार लिंक करणे आवश्यक करण्यात आले
Post Views: 702
