जागतिक धम्मगुरु दलाई लामा उपस्थित राहणार
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
मुंबई । झुंजार न्यूज
मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात येत्या 16 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय बौध्द धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व शांतीचा संदेश देणा-या या बौध्द धम्म परिषदेस जागतिक बौध्द धम्मगुरु दलाई लामा उपस्थित राहणार आहेत. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या दि.16 डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात लाखोंच्या संख्येने बौध्द आंबेडकरी जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज केले.
वानखेडे स्टेडीयम येथील गरवारे क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदाम आठवले बोलत होते . यावेळी उदयोजक कल्पना सरोज , माजी मंत्री अविनाश महातेकर , समिती महासचिव अविनाश कांबळे , रिपाई राज्य कार्याध्यक्ष गौतम सोनवणे , रिपाई मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे , सुनिल मोरे , विवेक पवार आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते .
