संगमनेरझुंजार न्यूज

शिर्डी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले हे आश्वी येथील खासदार शरदचंद्रजी पवार यांची सभा करून शिर्डीकडे परत असताना 10-12 अज्ञात व्यक्तींनी राजकीय सूडभावनेतून त्यांच्यावर लोखंडी गज, हॉकी स्टिक व चोपरने वार करत प्राणघातक हल्ला केला असून सचिन चौगुले व सुरेश आरणे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने संगमनेर येथील मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिर्डी मतदार संघासह अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
आश्वी बुद्रुक येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा आश्वी बुद्रुक येथे कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले व माजी नगरसेवक सुरेश आरणे हे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर चौगुले व आरने हे आपल्या क्रेटागाडी मधून शिर्डी कडे परत जात होते. आश्वी बुद्रुक मधूनच काही लोकांनी त्यांच्यावर पाळत ठेवून पाठलाग केला. लोणीमध्ये आल्यानंतर पाच-सहा मोटरसायकल मागे व पुढे एक कार अचानक आडवी झाली. यामधून उतरलेल्या चार लोकांनी हॉकी स्टिक, लोखंडी गज काढून चौगुले यांच्या गाडीची मोडतोड सुरू केली .याचबरोबर त्यांना गाडीच्या बाहेर ओढून मोटरसायकल वरील काही लोक व समोरच्या गाडीतील काही लोक असे दहा-बारा लोकांनी मिळून सचिन चौगुले व सुरेश आरणे यांच्यावर हॉकी स्टिक लोखंडी गज चोपर वापरून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पायाची, हाताची मोडतोड झाली असून दोघेही अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. लोणीच्या मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडली ही राजकीय सोडापोटी झाली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जखमींना तातडीने संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन सचिन चौगुले व सुरेश आरणे यांची भेट घेत चौकशी केली.

यावेळी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय असून हे दोघेही युवक कार्यकर्ते खासदार शरद पवार साहेब व आमच्या कार्यक्रमासाठी आश्वी येथे आले होते .राजकीय सुडातून पाळत ठेवून असा हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतीचे राजकारण करण्याची ही पद्धत आहे. आहे दहशतीचे राजकारण शिर्डी व महाराष्ट्रातील जनता कदापिही सहन करणार नाही. पोलिसांनी तातडीने आरोपींना पकडून कडक कारवाई केली पाहिजे. पोलीस दलाने निरपेक्ष पद्धतीने काम करावे अशी आमची अपेक्षा आहे.

या घटनेमुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात तीव्र संतापाची लाट  निर्माण झाली असून अशी दहशतीचे व दडपशाहीची राजकारण  अत्यंत दुर्दैवी ,चुकीचे व महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासाला काळीमा फासणारे असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहे.

या घटनेतील आरोपींना तातडीने पकडून कडक कार्यवाही करावी अशी मागणी शिर्डी विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली असून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांनी चौगुले यांच्या भेटीसाठी मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *