आश्वी । झुंजार न्यूज

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई यांना अमरावती लोकसभा अनुसूचित जाती मतदारसंघातून खासदारकीची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी संगमनेर येथील आश्वी बुद्रुक मध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पद्मभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्हा शिष्टमंडळांनी केली .

 

यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस किशोर वाघमारे संगमनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोकळ सरचिटणीस गौतम रोहम जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब जमदाडे आश्वी गटप्रमुख भारत गायकवाड शिबलापूर शाखाप्रमुख रवी मुन्तोडे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख इनामदार बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य कॉम्रेड कानिफनाथ तांबे रघुनाथ तांबे नामदेवराव तांबे राहता तालुका उपाध्यक्ष अशोकराव भोसले दाढ बुद्रुक शाखाप्रमुख योगेश तानाजी सातपुते आदी शिष्टमंडळांनी आश्वी बुद्रुक येथे झालेल्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी पद्मभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई यांना खासदारकीची उमेदवारी द्यावी कारण देशाचे वातावरण अतिशय दूषित झाले असून संविधान वाचविणे अत्यंत गरजेचे आहे सध्याच्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने लोकशाहीकडून हुकूमशाही कडे वाटचाल केली असून आमचे नेते राजेंद् गवई हे महाविकास आघाडी सोबत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा करत असून कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता त्यांनी दोन विधानसभा वगळता मागील सर्व विधानसभा लोकसभा प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून निळा झेंडा देऊन महाविकास आघाडीला वेळोवेळी सत्ता दिलेली आहे परंतु त्या सत्तेच्या बदली महाविकास आघाडीने रिपब्लिकन गवई पक्षाला सत्तेमध्ये कोठेही वाटा दिलेला नाही व पद दिले नाही तसेच मागील पंचवार्षिकला अमरावती लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर राजेंद्र गवई हे अंतिम उमेदवारी असून त्यांचे अचानक उमेदवारी बदल करून अमरावती येथे राणा दापत्याला उमेदवारी दिली त्यामुळे गवई यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे आणि यामुळे सबंध आंबेडकर समाज अमरावती जिल्ह्यासह रिपाई गवई पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीवर नाराज आहे त्यामुळे केंद्रातील आणि राज्याचे सरकार पायउतार करायचे असतील तर रिपब्लिकन गवई पक्षाची युती महाविकास आघाडीने अधिकृत करून डॉ राजेंद्र गवई खासदार करावे असे निवेदनामध्ये रिपाई गवई पक्षाच्या शिष्टमंडळाने खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे .

 

या निवेदनात म्हटले आहे की आमच्या पक्षाला किमान दोन खासदारकीच्या जागा तर कमीत कमी दहा आमदारकीच्या संपूर्ण महाराष्ट्रात जागा मिळावेत अशी मागणी डॉ राजेंद्र गवसे राष्ट्रीय नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या वतीने पवार यांना करण्यात आली असून या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम सरचिटणीस किशोर वाघमारे अहमदनगर शहराध्यक्ष सुशांत मस्के महिला जिल्हा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अलकाताई बोरुडे शहर अध्यक्ष ज्योतीताई पवार जिल्हा सरचिटणीस तुकाराम जाधव सर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र घायवट कायदेशीर सल्लागार रमेशराव बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब जमदाडे संगमनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोकळ तालुका सरचिटणीस गौतम रोहम संगमनेर शहराध्यक्ष राजाभाऊ अहिरे जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर बोरुडे अश्विनी गटप्रमुख भारत गायकवाड पठार भाग प्रमुख वसंत खरात शरद भालेराव आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवेदनावर सह्या आहेत

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *