संगमनेर । झुंजार न्यूज 

काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील ग्रामिण विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या ई-मार्केट पुरस्काराने गौरविण्यात आले.

गांधीनगर, गुजरात येथे नॅशनल को-ऑपरेटीव्ह डेअरी फेfडरेशन ऑफ  इंडिया यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार देशाचे गृह व सहकारमंत्री मा. नामदार  अमित शहा यांचे शुभहस्ते दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी स्वीकारला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री मा. नामदार भुपेंद्रभाई पटेल, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. मिनेश शहा, राष्ट्रीय सहकारी डेअरी इंगेडरेशन चे अध्यक्ष मा. डॉ. मंगल जीत राज्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी दूध संघाची स्थापना केलेली असून त्यांच्या आदर्श विचारावर या संघाची वाटचाल चालू आहे. पारदर्शक व चांगल्या कामातून  राज्यात हा दूध संघ आदर्श ठरला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला आधिक स्थिरता निर्माण करण्यासाठी दूध संघ कटीबध्द आहे. सहकारी दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर  दिला जातो. त्या माध्यमातून तालुक्यात  सुमारे 7 लाख लिटर दुधाची निर्मिती होत आहे. सहकाराच्या माध्यमातून समृध्दी निर्माण करणाऱ्या संगमनेर दूध संघाला राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

दूध संघास सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळाल्याबददल राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा. खेमनर,  माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीतभाऊ थोरात, बाबा ओहोळ, सुधाकर जोशी, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात. शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहारी कातोरे आदीसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *