मुंबई | झुंजार न्यूज

 

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार -2023 जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच चित्रपटसृष्टीत त्यांनी विशेष ओळख देखील निर्माण केली. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. 

अशोक सराफ यांनी  केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून  घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *