नगर । झुंजार न्यूज

 

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर मा . दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांना जाहीर झाल्यांने विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होताना दिसत आहे .

सुनिल साळवे हे जामखेड तालुक्यातील नान्नज येथील कार्यकर्ते असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी व तत्वाशी समरस होवून तळागाळातील लोकांकरिता धडपडणारा एक आक्रमक व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे दलित पँथरपासून ते केद्रींय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठेने काम करत आहे अहमदनगरचा दक्षिण भाग म्हणजे एक दुष्काळी पट्टा असल्याने समाज्यात काम करताना फार अडचणी येतात त्यातूनही मार्ग काढत सुनिल साळवे यांनी बहुजन समाज्यात आपली एक नाविन्यपुर्ण ओळख निर्माण केली .
दलित पँथर ते रिपब्लिकन चळवळ प्रवास करताना सामान्य कार्यक्रता म्हणून अनेक वर्ष काम केले . त्यानंतर जामखेड तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी तेव्हाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी दिली . त्या संधीचे सोनं करताना सुनिल साळवे यांनी सातत्याने आपला चढता आलेख ठेवला दलित समाज्यासह बहुजन समाज्यावरील अन्याय अत्याचाराविरोधात सातत्याने आंदोलन , मोर्चा , रस्ता रोको , उषोषण करत लोकांना न्याय मिळवून दिला तसेच राज्यस्तरिय ” जातीय सलोखा परिषद ” ” दलित हक्क परिषद घेवून सामाजिक ऐक्य लढा उभा केला . तसेच सामाजिक कार्यात काम करताना राजकिय , सहकार , शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात आपला दबाव गट निर्माण केला . हसमुख व प्रेमळ स्वभावातून मित्र परिवार मोठ्या प्रमाणात जोडला गेला . मात्र समाज्यावर अन्याय झाला असता कधी ही क्रॉम्प्रमाईज भूमिका घेतली नाही सत्यला सत्यताचं पाळली प्रसंगी मंत्री , खासदार , आमदार व आधिकाऱ्यांना धारेवर धरले . 
२००९ ला रामदास आठवले यांचा शिर्डीमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने जिल्ह्यात रिपाईची वाताहत होवू लागली त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले अशातचं दोन जिल्हाध्यक्ष देण्याची धोरण ठरले त्यानुसार दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सुनिल साळवे यांची नियुक्ती झाली . नव्यानं जिल्हाध्यक्षपद मिळाल्याने साळवे यांची गाडी सुसाट सुटली दलित समाज्यासह बहुजन समाज्यात जात साळवे यांनी एक एक माणुस जोडण्यास सुरुवात केली . प्रेमळ , आक्रमक भूमिका ठेवत श्रीगोंदा , पारनेर , जामखेड , शेवगांव , कर्जंत , पाथर्डी , नगर , राहुरी , तालुक्यात तरुण कार्यकर्त्याची फळी निर्माण केली . त्यातून रिपब्लिकन पक्ष वाढीचा कार्यक्रम सुरु झाला ” गांव तेथे शाखा ” ही भूमिका ठेवून गांवो गावी शाखा स्थापन केल्या . सातत्याने महिला , सर्व सामान्य माणुस , तरुणांचे त्याकडे आकस निर्माण झाला विलंब न करता तातडीने अडचणी , समस्यांचा मार्ग काढत काम करण्याची हातोटी साळवे यांची असल्याने सर्वाच्या त्यांच्या अपेक्षा लागून राहिल्या . सुनिल साळवे म्हणजे दक्षिणेचे एक प्रकारे रामदास आठवलेचं समजले जात .
राजकिय , सामाजिक , सहकार क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुनिल साळवे हे माणसातील माणुसपणानेचं असल्याने आपले दैनदिन जीवनक्रम हा समाजसेवेत घालणारे साळवे यांना ” डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित समाज भूषण पुरस्कार ”  मिळणे स्वाभाविक ठरणार ! त्यामुळे अभिनंदनचा वर्षाव हा सुद्धा होणारचं !
 मंगळवार दि १२ मार्च २०२४ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *