{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी । झुंजार न्यूज

तरुणांनी नोकरी न करता लहान-मोठे व्यवसाय केले पाहिजेत. कोरोना साथीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे समाजात बेराेजगारी वाढल्याने स्पर्धा वाढली असून या स्पर्धेच्या युगात तरुणांनी संकोच किंवा लाज न बाळगता व जिद्दीने लहान-मोठे व्यवसाय सुरु करुन आपल्याला व कुटुंबाला यशाच्या प्रवाहात आणा असे आवाहन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले .
 संगमनेर तालुक्यातील जाखोरी येथे वैभवलक्ष्मी  एंन्टरप्रायजेस या फर्मचे उद्घाटन रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते झाले या प्रसंगी देशमुख बोलत होते . 
यावेळी बाळासाहेब शिंदे ,बाळासाहेब देशमुख , बाळासाहेब राहणे , राजेद्रं देशमुख, ह.भ.प संजय महाराज देशमुख, वैभवलक्ष्मी एंन्टरप्रायजेसचे मालक ऋषिकेश देशमुख व नानासाहेब देशमुख आदीसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येंने उपस्थित होते.
यावेळी देशमुख पुढे म्हणाले की , आजच्या तरुण पिढीने काही मिळवायचे असेल तर धेयाकडे लक्ष केंद्रित करावे. संघर्षातच विजय आहे. चिकाटीने धेय्य साध्य करावे. जो या स्पर्धेच्या युगात टिकेल तोच टिकेल नाहीतर येणारा काळ हा खूप वाईट असेल.” तर प्रत्येक क्षेत्रात अफाट जिद्द, कष्टाची तयारी आणि बुध्दीमत्ता, कल्पकता वापरून उद्योग क्षेत्रात तरुणांनी आपल्या करियरची सुरुवात करावी. परिस्थिती कठीण असो जिद्द, कष्ट, आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर कठोर प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते असे शेवटी सांगितले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *