महसूल व दुग्धोविकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील ६ कोटी २० लाख रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा भुमिपुजन व उदघाटन समारंभ शुक्रवार दि ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती संरपच सौ सुवर्णाताई संदिप घुगे यांनी दिली .
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील , डॉ सुजय विखे पाटील , युवा नेते संदिपराव घुगे , भगवानराव इलग पाटील , प स सदस्य गुलाबराव सांगळे , प स माजी सभापती अंकुशराव कांगणे , तबाजी मुन्तोडे , ॲड पोपटराव वाणी , रामभाऊ भूसाळ , जेहूरभाई शेख , डिग्रस संरपच अशोक खेमनर , आदीसह आश्वी व परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहे .
राज्याचे महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मालुंजे गांवाकरिता गेल्या १० वर्षापासून विकास कामांची घोडदौड झाली असून कोट्यावधी रुपयेचे कामे झाली मालुंजे गाव तसे दुष्काळी भागातील अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची वणवण मात्र तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत जलगतीने सोडवत साडे तीन कोटी रुपये मंजूर करत पाणी पुरवठा योजना मंजूर केली संदिप घुगे यांनी आपल्या कार्यकाळात पिण्याचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी पाठ पुरावा केला . गेल्या १० वर्षात विखे परिवाराच्या माध्यमातून गावांने ही विकासाची गंगोत्री पाहिली . मालुंजे गाव शिर्डी विधानसभा मतदारसंघात नसताना सुध्दा विखेच्या प्रेमाखातर विशेष निधीचा वापर करत लोकांना विकास दिला गेला असल्याची परिसरातून चर्चा होत आहे .