पाथर्डी l झुंजार न्यूज
राज्यात महायुती सोबत आरपीआय (आठवले गट) युती असून, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी युती करताना सत्तेत १० टक्के वाटा मागितला असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये महायुतीतल्या तिन्ही पक्षातील नेत्याचे फोटो छापले जातात. मात्र, ना. आठवलेंचा फोटो छापला जात नाही, त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे असे मत आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी व्यक्त केले आहे.

पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील आरपीआयच्या प्रमुख कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात शेवगाव येथे नुकतीच बैठक झाली. बैठकीमध्ये अध्यक्षपदावरून बोलताना वाकचौरे म्हणाले की, आरपीआयची राज्यातील भाजपबरोबर असलेली युती ही केवळ फक्त राजकीय असून, सामाजिक व धार्मिक कामात त्याचा काडीमात्रही संबंध येत नसल्याचे सांगून महायुतीचे आमदार आरपीआयच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत तसेच कार्यक्रमांनाही बोलावले जात नसल्याने अनेक कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर मतदारसंघात आरपीयायचा मेळावा घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरवली जाईल.

दक्षिणेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की, महायुतीकडून आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तर आम्ही महायुतीच्या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा निवडून येण्यापासून रोखू, असा इशारा साळवे यांनी या वेळी दिला.

यावेळी पक्षाचे शेवगाव तालुका प्रमुख सतीश मगर, पाथर्डी तालुका प्रमुख बाबा राजगुरू, मार्केट कमेटीचे संचालक रवि आरोळे, रमेश शिरकाडे, सुनिल अहुजा यांची भाषणे झाली. या वेळी गणेश साळवे, राजेंद्र मगर, कडू मगर, निरंजन बोरुडे, प्रदीप मोहिते राकेश गरुड, अमोल आहेर, राजू घुटे, निलेश जगधणे, बाबासाहेब खिल्लारे, विठ्ठल मगर, शांतवन गरुड, महेश अंगरखे, विकास मगर, अमोल धस, सुरेश शिंदे, अमोल गजभिव, अजय जगधने, हर्षद मगर, दत्ता पाटील, भारत गजभिव, अभिषेक मगर, अमोल वाघमारे, राहुल भिसे, अशोक आहेर, सचिन आहेर आदी उपस्थित होते. गौरव मगर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन महेश अंगरखे यांनी केले. आभार रवि आरोळे यांनी मानले.
Post Views: 728

