केंद्रीय कृषिमंत्री व ग्रामीण विकासमंत्री राजसिंह चौहान यांचे संगमनेरला भेट
संगमनेर । झुंजार न्यूज
विधानसभेच्या निवडणुकीत हरियाणा आणि महाराष्ट्रात बदल झाला आहे, सध्या केंद्रात डबल इंजिन तर राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे ज्याप्रमाणे मध्य प्रदेश मध्ये लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार केला असाच चमत्कार महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडक्या बहिणीने केला असल्याचा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री आणि ग्रामीण विकासमंत्री राजसिंह चौहान यांनी व्यक्त केला
नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय कृषिमंत्री तथा ग्रामीण विकासमंत्री शिव राजसिंह चौहान यांनी शिर्डी शनिशिंगणा पुढचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर ला जाताना संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर ते काही वेळ थांबले होते यावेळी संगमनेर तालुक्याच्या वतीने आ अमोल खताळ यांनी त्यांचे स्वागत केले याप्रसंगी व्यास पीठावर भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गण पुले तालुकाध्यक्ष वैभव लांडगे शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे आदीभाजप शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते
ना चौहान म्हणाले की केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 हजार 800 कोटी रुपयांच्या पीक विमा जमा झाला मुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे परदेशातून आलेले नवीन तत्रज्ञान तसेच शेतकरी आपल्या शेतात करत असलेल्या विविध प्रयोगा मुळे शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन होत आहे आणि त्या माध्यमातून देशातील शेतक ऱ्यांचे जीवनमानही उंचावेल असाविश्वास व्यक्त करत ते म्हणाले की देशातील गोर गरिबांना गरीबांना घरे देणार सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आण णार आहे, सरकार तुमच्यासोबत आहे ग्रामीण भागाचा विकास करणार आहे, ग्रामीण भागात 2 कोटी रुपये करण्याचा सरकारचा मानस आहे.
आमदार खताळ यांनी चाळीस वर्षाची सत्ता पलटवली-ना चौहान
गेल्या अनेक वर्षांपासून आपण नवीन वर्षाच्या स्वागतालाच महाराष्ट्रातील शिर्डीचे साईबाबा शनिशिंगणापूरचे शनि महाराज आणि त्र्यंबकेश्वर चे निवृत्तीनाथ महाराज यांचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करत असतो त्या निमि त्ताने प्रत्येक वर्षी नित्यनेमाने मी संगमनेर येथे येत असतो यावर्षी तर आ अमोल खताळ यांनी एका मोठ्या राजकीय पक्षा च्या नेत्याची ४० वर्षाची सत्ता संपुष्टात आणून एक वेगळा चमत्कार केला आहे
ना शिवराजसिंह चौहान
केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री भारत सरकार
केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण हे शिर्डी वरून थेट नाशिक मार्गे त्रंबकेश्वर ला जाणार होते परंतु संगमनेरकरांच्या प्रेमापोटी संगमनेर वरून जाण्याचा निर्णय घेतला आहे मी त्यांचे तालुक्याच्या वतीने स्वागत करत आहे मागील वर्षी तुम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून संगमनेरमध्ये आले होते परंतु या वेळी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री म्हणून आलेले आहेत तुम्ही अजूनही उच्च पदावर जावो या संगमनेर करांच्या तुम्हाला शुभेच्छा आहे आहे मात्र तुम्ही आम्हाला विसरू नका
आमदार अमोल खताळ
सदस्य संगमनेर विधानसभा मतदारसंघ
