पुणे । झुंजार न्यूज

पुणे येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व, आयु. कल्पित विजयराव वाकचौरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन उद्योग आघाडी महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आशयाचे नियुक्त पत्र केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी दिले आहे .  

 

कल्पित वाकचौरे हे फ्लॅट नं. २१०३, पी.डब्ल्यू.सी. टॉवर-ए, स्काय साँग बर्ड सोसायटी, भुगांव, पुणे येथे राहणारे आहेत. त्यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील भरीव योगदान, तसेच पक्षाच्या वाढीसाठी आणि व्यापकतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही महत्त्वपूर्ण नेमणूक करण्यात आली आहे.

या नियुक्तीपत्रात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी, तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासाचे कार्य करून रिपब्लिकन उद्योग आघाडीला अधिक व्यापक करण्यासाठी कल्पित वाकचौरे प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष मा. ना. रामदास आठवले यांनी कल्पित वाकचौरे यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed