आश्वी । झुंझार न्यूज
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे कोल्हार-संगमनेर रस्त्यावर सर्वपक्षीय आंबेडकरी अनुयायांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे लोकशाही धोक्यात आली असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आशिष शेळकेसह इतर आंदोलकांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना आशिष शेळके म्हणाले की, जर देशाचे सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य माणूस कसा सुरक्षित राहील? हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याचे नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरही विरोध होत असेल तर, याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. सरन्यायाधीशांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आशिष शेळके यांनी यावेळी केली.
प्रा. अनिल मुन्तोंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मूलभूत गोष्टी नष्ट करण्याचे धोरण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. हक्क आणि अधिकार कोणीही फुकट दिलेले नाहीत, ते चळवळीतूनच प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आंबेडकरी अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
या आंदोलनात रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके, कैलास कासार, योगेश मुन्तोंडे, महिला आघाडीच्या नेत्या सौ रुपाली सोनवणे , प्रा .अनिल मुन्तोंडे, अनिल बर्डे , राजेंद्र मुन्तोंडे, नानासाहेब कदम, बाळासाहेब कदम, जनार्धन साळवे , सर्जेराव सोनवणे, विजय खरात, सिद्धार्थ खरात, भारत गायकवाड, संग्राम शेळके, रवी रुपवते, मधुकर सोनवणे , स्वप्नील कदम , अनिकेत खरात अनिल खरात ‘ अशोक शेळके, रवींद्र शेळके , प्रतीक शेळके , राहुल बर्डे , आकाश पवार , सागर शिंदे आनंद केदार ‘ रोहित शेळके , कल्याण कदम ,गौरव जगताप , स्वप्निल जगताप , रमेश भोसले , रावसाहेब पंडित , भरत भोसले , जग्गू बर्डे , विजय शेळके , सुनील कदम , अमोल खरात , गणेश खरात , ओंकार खरात , किरण जगधने , सागर थोरात , शुभम खरात सागर खरात यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .
या आंदोलनामुळे कोल्हार-संगमनेर रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने आणि आंदोलकांच्या मागणीचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले. या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.



