सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज (शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर २०२५) सकाळी ११ वाजता संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील कोल्हार-संगमनेर रस्त्यावर आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन होणार असून या हल्ल्यामुळे लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरील वाढत्या धोक्याची चिंता व्यक्त करत, हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे .
यावेळी शेळके यांनी दिलेल्या निवेंदनात म्हटले की ,”न्यायव्यवस्थेवर झालेला हा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला आहे. सरन्यायाधीशांसारख्या उच्च पदावरील व्यक्ती सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कशी करावी?” असा प्रश्न उपस्थित करत या हल्ल्याच्या विरोधात निमगांव जाळी येथील कोल्हार-संगमनेर रस्तावर शुक्रवारी दि . १० आक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे .
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीता हा रस्ता रोको सर्व पक्षीय व आंबेडकरी चळवळीतील आनुयायांचा होणार आहे तर भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत असे निवेंदनात म्हटले आहे .