मुंबई । झुंझार न्यूज

राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईतील त्यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिक, कार्यकर्ते आणि प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांशी आत्मीय संवाद साधत त्यांच्या स्थानिक पातळीवरील समस्या, विकासकामे आणि शासनाच्या योजनांबाबतच्या अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या.

या भेटीदरम्यान, ना. विखे पाटील यांनी नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जनसामान्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद, पारदर्शकता आणि परस्पर विश्वास यांवरच प्रगतीचा पाया उभा राहतो.

ना. विखे पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, या भेटीत नागरिकांनी व्यक्त केलेले विचार आणि सूचना आगामी काळात उपाययोजना राबवताना अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख ठरतील. यामुळे शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतील आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed