साहित्य संस्कृती व समाजकारणावर चर्चा

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तथा ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांची महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सदिच्छा भेट घेतली. साहित्य, विचार आणि समाजकारण यावर त्यांनी चर्चा केली.

सांगली येथील निवासस्थानी प्रा.तारा भवाळकर यांची माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी ताराबाईंनी स्वतः संपादित केलेले ‘आचार्य जावडेकर: पत्रे आणि संस्मरणे’ हे पुस्तक बाळासाहेब थोरात यांना स्नेहभेट म्हणून प्रदान केले.

पुस्तकाच्या माध्यमातून विचारांचा वारसा जपण्याची त्यांची बांधिलकीही या क्षणातून प्रकर्षाने जाणवली. दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील त्यांच्या अध्यक्षीय भाषणाने साहित्य आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांना नवी दिशा दिली आहे. त्या भाषणानंतर उमटलेल्या विविध प्रतिक्रिया, विचारांची देवाणघेवाण आणि त्याचे व्यापक परिणाम यावरही यावेळी मनमोकळी चर्चा झाली.

यावेळी तारा भवाळकर यांनी संतांचा विचार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि विविध बोलीभाषांनी महाराष्ट्र अधिक समृद्ध केला आहे, असे विशेषत्वाने नमूद केले. त्यांच्या या विचारांतून मराठी भाषेची व्यापकता आणि सांस्कृतिक ऐक्य अधोरेखित झाले.

याचवेळी संगमनेर येथे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने झालेल्या पूर्वीच्या भेटींच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी साहित्य, संस्कृती सध्याचे राजकारण, समाजकारण यांसह यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेल्या परंपरेबाबत प्रदीर्घ चर्चा केली यानंतर संगमनेर भेटीसाठी निमंत्रण ही माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी संमेलन अध्यक्ष तारा भवाळकर यांना दिले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed