संगमनेर । झुंझार न्यूज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षांतर्गत तसेच रयत शिक्षण संस्था संचलित स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन, श्रीरामपूर येथे आयोजित ‘डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला’ कार्यक्रमात व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व चिंतनशील व्याख्यान दिले.

“रेषा बोलतात… रेषा हसवतात” या आगळ्यावेगळ्या विषयावर बोलताना गाडेकर यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील वास्तव, तरुणाईसमोरील आव्हाने आणि सकारात्मक बदलांची गरज अधोरेखित केली. सोशल मीडियाचा अतिरेक, वाचन संस्कृतीचा होत चाललेला ऱ्हास, वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासातील सातत्य आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या विषयांवर त्यांनी मार्मिक उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
डिजिटल बोर्डवर क्षणार्धात रेषा उमटवत त्यांनी साकारलेली जिवंत व्यंगचित्रे विद्यार्थ्यांना खळखळून हसवून गेली; मात्र त्या हसण्यातूनच सामाजिक भान आणि आत्मपरीक्षणाचा संदेश दिला. “हास्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून ते प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे,” हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, वेळेचे महत्त्व ओळखण्याची जाणीव आणि स्वतःमध्ये एखादी कला जोपासण्याची प्रेरणा निर्माण झाली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरला.

या कार्यक्रमासाठी संगमनेरहून संगमनेर साहित्य परिषदेचे प्राचार्य दिलीप उदमले आणि महेश गोडसे हे आवर्जून उपस्थितीत होते.

यावेळी या कॉलेजचे प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे (प्राचार्य ), डॉ. रामदास नान्नर (उपप्राचार्य ), डॉ. विजय पाटोळे (समन्वयक, आय. क्यू. ए. सी.), डॉ. अनिल करवर (केंद्र कार्यवाहक )आणि या कॉलेजचे प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पुनम बिडगर व प्रियंका जाधव यांनी केले आभार वाघ स्नेहल यांनी मांडले. 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed