संगमनेर : झुंजार न्यूज
मार्च – एप्रिल – मे हे तीन महिन्यांतील जत्रा – यात्रा मधून ग्रामिण भागातील माणसाचा तमाशा , कुस्त्या व बैलगाडा शर्यती मधून छेंद व उत्साह दिसून येत असल्याचे चित्र शिबलापूर येथे भैरवनाथ यात्रा निमित्ताने घेण्यात आलेल्या बैलगाड्या शर्यतीतून दिसून आले .
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या ४ वर्ष यात्रा – उत्सव यावर विरझन आले होते ग्रामिण भागातील माणुस पारंपारिक छेंदापासून बैचेन दिसला मात्र २०२३ हे वर्ष जणु ग्रामिण माणसाला भाग्याचे ठरले समाधान कारक पाऊस झाला मात्र पिक माला भाव मिळेना , अवकाळी पावसामुळे हातचे पिके गेली मात्र ग्रामिण , शेतकरी डगमगला नाही संध्या गावोगावी होणाऱ्या यात्रा उत्सवामधून आपल्या छेंद जोपसत आपला उत्सव लपून ठेवला नाही .

तालुक्यातील पुर्व भागाकडील शिबलापूर , मालुंजे , शेडगाव , खळी , ओझर , उंबरी – बाळापूर , झरेकाठी , पानोडी आदी गावांमध्ये यात्राचा धुमधडका सुरु असून पारंपारिक संस्कृतीला पसंती देत लोककला ( तमाशा , बैलगाडया शर्यती व कुस्त्या स्पर्धा ठेवून आपला छेंद पुर्ण करत आहे . नुकत्याचं झालेल्या शिबलापूर येथील भैरवनाथ यात्रा निमित्ताने झालेल्या बैलगाडया शर्यतीत सोनुसी , उंबरी – बाळापूर , ओझर , काकडी , पानोडी , पिंप्री लौकी अझमपुर , खळी , झरेकाठी , मालुंजे , दाढ , आदी गावांतील बैलगाड्या शौकिन तरुणांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला . पचायत समिती माजी सदस्य तबाजी मुन्तोडे , माजी संरपच दिलावर शेख , माजी उपसंरपच जेहूरभाई शेख ,आण्णासाहेब म्हस्के , संरपच प्रमोंद बोंद्रे , उपसंरपच सुनिल मुन्तोडे , दिपकराव रक्टे , बाळासाहेब मुन्तोडे , प्रकाश शिंदे , राजू नागरे , अशोक वालझाडे , आदी यात्रा कमिटीच्या नियोजनाखाली बैलगाड्या शर्यती उत्साहात पार पडल्या . शेवटचे ७ हजार रुपये बक्षिस सोनुसी वाल्यानी पटकावंली . बैलगाडी शर्यतीकरिता यात्रा कमिटीने लाखोंचे बक्षिसे वाटून बैलगाड्या शर्यतीत उत्साह वाढविला .
चौकटशिबलापूर येथील भैरवनाथ यात्रेत अत्यत मोठ्या प्रमाणात परिसरातील लोकांनी आपला सहभाग नोंदविला तसेचं व्यावसायिकांनीही आपली दुकाने लावून व्यवसाय केला . मनोरंजनात्मक म्हणून काळू – बाळू लोकनाटय तमाशा , बैलगाड्या शर्यती , कुस्त्या स्पर्धासह यात्रा शांततेत झाली . परिसरातील भाविकांचे आभार उपसंरपच सुनिल मुन्तोडे यांनी मानले !
