संगमनेर : झुंजार न्यूज      

 

आदिवासी समाजाची महाराष्ट्रात प्रती पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील चास पिंपळदरी येथिल आदिवासिंचे श्रद्धास्थान येडूमाता देवींची चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मोठी यात्रा भरते.महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्खेने आदिवासी समाज उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घेतो.त्या अनुषंगाने आदिवासी प्रबोधन सेवा संघ व तंटया ब्रिगेड,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतिवर्षी भव्य येडूमाता दर्शनासाठी भक्त पायी येत असतात . येडूमाता भक्त शास्री महाराज ,ह.भ.प.मेटेमहाराज ,बंगड,सातपुते ,रोकडे,नाईक, महिला,पुरुष, भाविक ,मोठ्या संख्खेने पायी चालत अंभोरे येथिल पुण्यनगरीत आगमन झाले.त्यांचे ढोल ताश्याच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.

भाविकांचे सरपंच सौ.सुरेखाताई भाऊसाहेब खेमनर,उपसरपंच श्री.किसनराव खेमनर,सोसायटी चेअरमन श्री.रावजी भागा खेमनर ग्रामपंचायत सदस्य श्री.भाउसाहेब रखमा खेमनर,सौ.रुपाली गोरख कदम,सौ.नंदिनी माणिक पवार,श्री.नामदेव बर्डे,श्री.गंगाराम बर्डे,श्री.विष्णू बर्डे,श्री.माणिक पवार,शिवाजी पवार,बाळू बर्डे,संतोष बर्डे, आदींनी उपस्थित मान्यवर प्रमुख येडूमाता भाविकांचा सत्कार केला.उत्कृष्ठ समीक्षक यावर्षीचा पुरस्कार शास्री महाराज यांना उपस्थितांचे हस्ते देण्यात आला.

यावेळी  ह.भ.प.मेटे महाराज यांचा हरी कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन सन्माननीय रणजितसिंह देशमुख ,माजी सरपंच भास्करराव खेमनर यांचे विशेष सहकार्य लाभले.

मा .रणजित दादा देशमुख मित्र मंडळ,ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच , सदस्य,सोसायटी चेअरमन रावजी भागा खेमनर , भाऊसाहेब खेमनर यांच्या सहकार्यातून भाविकांना भोजन देण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजीत देशमुख मित्र मंडळ ,एकलव्य संघटना ,पदाधिकारी,सदस्य,आदिवासी बांधव,गावातील भजनी मंडळ,मंडळाचे डॉ.नानासाहेब कोटकर,ज्ञानदेव खेमनर,कोंडाजी वाघमोडे,लक्ष्मण खेमनर,श्री.तारडे,नाना सुर्यवंशी,तात्याराम खेमनर,चंद्रकांत कडनर , देवराम पाराजी खेमनर,रखमा ठका खेमनर, श्री.योगेश खेमनर,गणेश साळवे ,रावसाहेब बर्डे,विठ्ठल बर्डे,भिमा बर्डे,सुनिल पवार,लहू माळी,अनिल बर्डे,गणेश जाधव,शिवाजी बर्डे,सुनिल बर्डे ,समाधान मोरे,रामनाथ बर्डे,गोरख मोरे,विकास पवार,देवीदास बर्डे,भागवत बर्डे,कोंडाजी जाधव,मुकेश बर्डे,कृष्णा माळी,सुनिल माळी,सेल्समेन गोरख खेमनर, अशोक हळ्नर,आदेश गायकवाड़,सोपान गायकवाड़,इत्यादींचे सहकार्य लाभले.

सुत्रसंचालन सुभाषराव हळनोर  यांनी केले.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed