पुणे : झुंजार न्यूज

सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात.

दिवसेंदिवस गौतमी पाटीलचे फॅन फॉलोव्हिंग वाढताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.

दरम्यान आता गौतमी पाटीलने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. खाजगीत दिलेल्या मुलाखतीत गौतमीला तिच्या लग्नाविषयी विचारण्यात आले. ज्यावर तिने हो मला लग्न करायचं आहेच अशी प्रतिक्रिया दिली.

पुढे ती म्हणाली की, मी लहानपणी मुलींच्या शाळेत होते, बाबा सोडून गेल्यावर घरी कोणीच पुरुष नव्हता, ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. यानंतर पण कधीच कोणत्या पुरुषाशी वैयक्तिक असा संबंध आला नाही. अशावेळी आता घरातल्या जबाबदाऱ्यांचा निदान अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असावा अशी इच्छा आहे. म्हणून मला लग्न करायचंय.

पुढे गौतमीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अपेक्षा सुद्धा सांगितल्या. ती म्हणते की, मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा कशाची गरज नाही पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा माझा जोडीदार हवा आहे. त्यामुळे असा मुलगा जेव्हा मिळेल तेव्हा मी लग्नाचा विचार करेन.

गौतमीने अलीकडेच तिच्या कुंकू लावून व्हायरल झालेल्या फोटविषयी सुद्धा स्पष्टीकरण देत सांगितले की, बघा आपण जे काम करतो त्यात प्रेक्षकांची आवड जपायची असते. त्यांना तसा लुक आवडतो म्हणून तसा केला होता.

मी अजून २५ वर्षाची आहे आणि माझं लग्न झालेलं नाही पण मला लग्न करायची इच्छा आहे, असे ती म्हणाली.

गौतमी पाटीलवर कितीही टीका होत असली तरी तिच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र आहे.

गौतमी पाटील लवकरच घुंघरु या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed