संगमनेर तालुक्यात यंदा  टँकर मागणीला ओहोटी
 
संगमनेर : झुंजार न्यूज
 उन्हाची तीव्रता वाढत असून तालुक्यात हळूहळू आता पाणी टंचाई जाणवू लागली आहे. एप्रिल महिन्यात ४ गावे १५ वाड्यांचे टँकर मंजूरीचे प्रस्ताव नगरला पाठविण्यात आले असून चौधरवाडी येथे एक टँकर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली. 
मागिल वर्षी समाधान कारक पाऊस व नंतर वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पाण्याची पातळी समाधान कारक आहे. मात्र आता उन्हाची तीव्रता वाढत चालली असून काही  गावातील पाण्याची पातळी खालावली आहे. पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायत पातळीवर नियोजन केले जात असून टँकर प्रस्ताव पंचायत समिती कडे पाठविले जात आहे. टँकर मजूरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. 
तालुक्यातील डोळासणे,  कर्जुलेपठार गुंजाळवाडी पठार,  पोखरी बाळेश्वर  ही चार गावे व या गावातंर्गत येणार्‍या १५ वाड्यांना पाणी टंचाई जाणवत आहे. टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीत दाखल होताच ते मजुरीसाठी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले आहे . तर चौधरवाडी या गावाला एका टँकरणे पाणी पुरवठा केला जात आहे. माळेगाव पठार येथीर विहिर अधिग्रहीत करण्यात आली आहे. मागिल दोन तीन वर्षीचा विचार करता यंदा टँकरची मागणी खूपच कमी आहे. एप्रिल महीना संपत आला असून पुढील मे महिन्या टँकरची मागणी वाढू शकते.  नंतर जून महिन्यात पाऊस पडला नाही तर परीस्थितीत फारसा बदल होणार नाही. भंडरदरा व निळवंडे धरणातही समाधान कारक पाणी साठा उपलब्ध आहे. यंदा शेतकर्‍यांनी रोटेशनची मागणी केली नाही. २०२४ मध्ये सुरूवाती पासूनच प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊसाने हजरी लावली.  तर अनेक भागात गारपिटही झाली आहे. या महिन्यात पाऊस गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वातावरणतील बदलामुळे शेती पिकावर परिणाम होत आहे. 
 चौकट-
अवकाळी व गारपिटीने पिकाचे नुकसान
गेल्या काही महिन्यांपासून सतत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी त्रस्त झाला आहे. पाणी उपलब्ध असेल तरी वातावरणात होणारे बदल शेतीसाठी नुकसानदायक आहे. सततच्या अवकाळी व गारपिटीने शेती पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed