शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे उघड. बिबट्याच्या हल्ल्याची अफवा
संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील बोटा परीसरातील वडदरा येथे शनिवार ( दि २२ ) रोजी रात्री साठे आठ वाजेच्या सुमारास ६३ वर्षीय उत्तम बाळाजी कुऱ्हाडे यांचेवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. बिबटयाने हल्ला केल्याचा बनाव करण्यात आला होता . मात्र शवविच्छेदन अहवालात व पोलिस तपासात खून झाल्याचे उघड झाल्याने घारगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वडदरा परिसरात उत्तम कुऱ्हाडे यांचा निर्घृणपणे धारदारशस्त्राने खून करण्यात आला. सुरुवातीला बिबट्याच्या हल्लात वृद्धाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आली. वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तेव्हा बिबट्याने हल्ला केल्याच्या कुठल्याही खूना दीसून आल्या नाही. शवविच्छेदना नंतर अंत्यविधी करण्यात आला. त्याचा अहवाल येणे बाकी होते, मंगळवारी( दि २५) रोजी अहवाल आला त्यात कुर्हाडे यांचा मृत्यू हा शस्त्राने वार करण्यात आल्याने झाला असे निष्पन्न झाले. कुऱ्हाडे टीव्ही पाहत असताना त्यांचेवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याने त्यांचे हातावर,छातीवर आणि पाठीवर धारदार शस्राचा जोरदार प्रहार झाला आहे. यात त्यांचे हृदय आणि फुफ्फुसाला गंभीर जखम होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचं वैद्यकिय अहवालात स्पष्ट झाले आहे.

बिबट्याने हल्ला केल्याने उत्तम कुऱ्हाडे यांचा मृत्यू झाल्याच्या अफवेने अनेक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली होती.घटना स्थळावर अनेक नागरिकांनी हाताळणी केली आहे.अनेक नागरिकांचा घटना स्थळावर वावर झाल्याने ठसे तज्ञ,श्वान पथक गुन्हे अन्वेषण विभागाला खुन्याचा मागोवा तसेच पुरावा शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश लोंढे, प्रमोद चव्हाण, राजेंद्र लांघे आता खुनाचा तपास करत आहे.सदर घटनेचा तपास पूर्ण झाल्यानंतर नेमका खून का ? आणि कशासाठी झाला हे समोर येणारं आहे. यादरम्यान घारगाव पोलिस स्टेशनचे पो .ना. राजेंद्र लांघे यांचे फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांसमोर या घटनेने आव्हान उभेक् केले आहे.

चौकट
सोसायटीचे कर्ज प्रकरण , धनादेश की रोख रक्कम कुऱ्हाडे हे बोटा गावचे विविध कार्यकारी सोसायटीचे नियमित कर्जदार होते.मार्च अखेर त्यांनी आपल्या कर्जाचा नियमित भरणा केला . दोन दिवसापूर्वी त्यांनी पुन्हा सोसायटीचे कर्ज घेतले .त्यांना मिळालेले कर्जाचा धनादेश आपल्या खात्यात वर्ग केला की रोख पैसे घेऊन घरी घेऊन गेले. पैसे घरी घेऊन गेले असतील तर त्यांचेवर पाळत ठेवून पैशासाठी त्यांचा घातपात झाला की काय ? कि अन्य दुसरे कारण आहे या दिशेने देखील तपास सुरू आहे. नेमकी या कर्जाची रक्कम कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
– बिबट्याने हल्ला केल्याची अफवा कशी पसरली
कुऱ्हाडे यांचा खुना झाल्यानंतर त्याच्या आईने जीवाच्या आकांताने आरडा ओरड केली.घटनास्थळी नागरिक तेथे आले तेव्हा नेमक काय घडलंय हा संभ्रम निर्माण झाला होता.परंतु बिबट्याने हल्ला केला ही अफवा कोणी आणि का पसरवली असा प्रश्न निर्माण झाला आहे.
