संगमनेर : झुंजार न्यूज
जीवनात यशाला सीमा नसते. जिद्द आत्मविश्वास प्रबळ महत्त्वकांक्षा,प्रगल्भ इच्छाशक्ती असेल तर यश हे तुमच्यापर्यंत आपोआप पोहचते.ज्याला जीवनात मोठ व्हायचं त्यांनी खुप वाचन केले पाहिजे.खुप मोठी स्वप्न पाहिली पाहीजे.जी माणसं जीवनात मोठी झाली.त्यांचे त्याग,वाचनाचा व्यासंग,खडतर प्रवास,कोटुंबिक,सामाजीक,आर्थिक अडचणी समजून घ्यायच्या असतील तर त्यांची चरित्र वाचली पाहिजे.चरित्रातून विद्यार्थ्यांना प्रेरणा,मार्गदर्शन मिळेल.देशाच्या विकासाची स्वप्न ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हाती आहेत असेे प्रतिपादन सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ सुधीर तांबेेे यांनी केले.

तळेगाव दिघे येथील लोकनेते बाळासाहेब थोरात महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी स.ब.वि.प्र. संस्थेचे सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर,खजिनदार तुळशीनाथ भोर,महेंद्र गोडगे ,सौ.सुमनताई गोडगे ,सचीन दिघे,अनिल कांदळकर,बाळासाहेब दिघे,रामभाऊ दिघे,केरू दिघे विद्यमान सरपंच सौ.उषाताई दिघे,उप-सरपंच मयुर दिघे,सार्थक कांदळकर,साईराज कांदळकर,प्राचार्य डॉ.डी.डी.पवार,उप-प्राचार्य राजेंद्र पानसरे उपस्थित होते.

माजी आमदार डॉ सुधीर तांबे यावेळी म्हणाले की, विकासाच्या जडणघडणीमध्ये ज्या समाजसुधारकांचा त्याग आहे.त्यांची चरित्र या वयात विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत.यासाठी महाविद्यालयीन ग्रंथालय,भौतिक सोई सुविधा वाढविण्यासाठी महाविद्यालयानेही प्रयत्न करायला हवा.आजकाल जगात गुणवत्तेला फार महत्व आहे.स्पधेच्या युगात,प्रवाहात,जर टिकायचे असेल तर ज्ञानवृद्धी शिवाय पर्याय नाही.ज्ञानदानात गरीब,श्रीमंत भेदाभेद नसतो.कितीतरी सामान्य कुटुंबातील विद्याथी आज वेगवेळ्या क्षेत्रात उल्लेखनिय असे कार्य करतात,त्यांचे मार्गदर्शन घ्या.आपल्याकडे गुणवत्ता असेल तर नोकरी आपल्याकडे चालून येईल.यशाला गुणवत्तेला परिणाम नसते असे सांगून आमदार डॉ.तांबे पुढे म्हणाले की,आपल्या महाविद्यालयाचा लौकिक महाराष्ट्रात वाढला पाहिजे, यादृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवा,ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांने मार्गदर्शक मानला पाहिजे.यासाठी सखोल अभ्यासाशिवाय पर्याय नाही.नुसती पदवी घेऊन गुणवत्ता सिद्ध करता येत नाही.तर त्या क्षेत्रात आपण कॅलीबर असलं पाहिजे.यावेळी सौ.सुमनताई गोडगे,महेंद्र गोडगे,दत्तात्रय चासकर यांचेही भाषणे झाली.प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.डी.पवार यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.रामदास आहेर यांनी तर डॉ.राजेंद्र गायकवाड यांनी आभार मानले.
