संगमनेर : झुंजार न्यूज
कार्यकर्त्यानी समाज्यामध्ये सातत्य ठेवल्यानेचं पक्ष अथवा संघटना जीवंत राहून एक ताकद वाढते तर शिर्डी येथे होणारे अधिवेशन हे रिपब्लिकन पक्षाबरोबर समाज्याची ताकद दाखविण्याचे महत्वाचे असल्याने हजारोच्या संख्येने तळागाळातील लोकांनी या अधिवेशानास यावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी केले .
संगमनेर येथील शासकिय विश्रामगृह येथे विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिर्डी येथील अधिवेशन आढावा बैठक संप्रन्न झाली . याप्रसंगी संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे , संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार , युवा तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे , विजय खरात , चद्रकांत सरोदे , मधुकर , सोनवणे , सुधाकर कदम , बाळासाहेब कदम , स्वप्नील कदम , गौतम पवार , सागर शिंदे , एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष अनिल बर्डे , महीला आघाडी तालुकाध्यक्ष सौ रुपालीताई सोनवणे , धनगर समाज महीला आघाडी तालुकाध्यक्ष सौ मिनाताई बिडगर आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की , सातत्य धडपड करित राहिल्यास पक्ष जीवंत राहतो . सामाजिक अधिवेशन आहे . समाज्याची ताकद वाढविणे , पुर्वीची परिस्थिती वेगळी होती आता स्वत : चे अस्तित्स निर्माण करणे कार्यकर्त्यानी नियोजन करा . लोकांपर्यत जा ! संपर्क साधा संघटन करा . अडचणी आहे त्यावर मात करा मित्र बदलले त्यामुळे सहकार्य होत नाही अधिवेशन कार्यक्रमाची निर्मिती करा .वादाविवाद बाजूला ठेवून शक्ती प्रदर्शन करुन दाखवा . सामाजिक न्याय हक्काकरिता स्वयंस्फुर्ती हवी . वाडा – कारखान्याच्या संदेशाची वाट पाहू नका . चळवळीतील कार्यकर्ते प्रामाणिक आहे नाराज होवू नका कार्यकर्त्यानी प्रयत्नशील असावे . बहुजन समाज्यातील हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे .

श्रीकांत भालेराव म्हणाले की , कार्यकर्त्यानी केवळ पद घेवून न्याय देता येत नसेल ही मोठी शौकातिका पक्षात काम करताना पगार नाही चळवळीत काम करणे पिंड पाहिजेल संघटन बांधण्याचे काम केवळ रामदास आठवले हे दोन्ही तालुके चळवळीचे आहे . एकमेकांचे ओढा – ओढी करु नका !

सुरेंद्र थोरात म्हणाले की ,रिपाई ची मोठी ताकद अधिवेशनाच्या माध्यमातुन दिसणार आहे . कार्यकर्त्यानी आपला मोल्यवान एक दिवस पक्षासाठी दया .
दिपकराव गायकवाड म्हणाले की , पँथर पासूनचे जुने कार्यकर्ते बाबासाहेब यांच्या विचाराचा खरा पक्ष हा केवळ रामदास आठवले यांचाचं कार्यकर्त्यानी चळवळ चालविताना एकमेकांना महत्व देणे तर संघटना वाढते त्यामुळे काम करण्यात उत्सव येतो राज्याचा मेळावा आहे मोठी ताकद दिसून येणार आहे . भविष्यात ताकद नुसार निवडणुका सोप्या होतील . संगमनेर , अकोले हे चळवळीचे तालुका असून कार्यकर्त्याचा मोठा सहभाग असतो .

यावेळी राजेंद्र गवांदे , चद्रकांत सरोदे , रमेश शिरकांडे यांची भाषणे झाली .
प्रास्ताविक आशिष शेळके यांनी केले . गावोगावी बैठका घेतल्या असून हजारोच्या संख्येने महीला – पुरुष शिर्डी येथे जाणार आहे .
