संगमनेर | झुंजार न्यूज
ऐन पावसाळ्यात मागील पंधरा दिवसापासून संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील ग्रामस्थाना पिण्याचे पाणी केवळ नावालाचं येत असल्याने संतप्त झालेल्या नागरीकानी सोमवारी दि. २६ जून रोजी ग्रामपंचायत येथे सकाळी भव्य पाण्यासह विविध मागण्याकरिता ‘हंडा मोर्चा’ काढला होता. यावेळी विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानतंर मोर्चा शांततेत स्थगित करण्यात आला.
उंबरी बाळापूर येथे सोमवारी सकाळी गावातून मोर्चा थेट ग्रामपंचायतपुढे दाखल झाला होता. यावेळी उपस्थित मोर्चेकऱ्यानी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. गावाच्या चारही दिशाला पाण्याचा मोठा साठा आहे. गावाच्या तिरावरुण प्रवरा नदी बरोबरचं गावाच्या मध्यभागातून प्रवरा डावा वाहत आहेत. परंतू गावातील नागरीकाना मागील पंधरा दिवसापासून तीव्रं पाणी टचाईचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायत मार्फत नियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्याकडे ग्रामपंचायत प्रशासन तसेचं जनतेने निवडून दिलेले सदंस्य दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरीकानी करत ग्रामपंचायतीचे सरपंच व प्रशासनाला यावेळी चागलेचं धारेवर धरले होते.
यावेळी गावातील सर्वसामान्य नागरीकाला पिण्याचे पाणी मिळत नाही, गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेमुळे साथीचे रोग प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकाचे आरोग्य लक्षात घेता औषध फवारणी करायला ग्रामपंचायतीकडे वेळ नाही. स्ट्रीट लाईट बंद राहणे, वाड्या वस्त्याना जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था, त्यामुळे नागरीकानप्रमाणे शालेय विद्यार्थ्यानची होणारी गैरसोय यासारख्या मुलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायाला ग्रामपंचायतीला वेळ नसल्याचा गंभीर आरोप उपस्थित ग्रामस्थानी करुन समस्याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली.
यावेळी संतप्त नागरीकानी पिण्याचे पाणी किमान ५० मिनटे दररोज सोडण्यात यावे, पाणी येण्याची वेळ निश्चित करण्यात यावी व रात्री – अपरात्री पाणी सोडू नये. वारंवार विद्युत मोटार जळणे, लाईट नाही, पाइपलाइन फुटने या कारणाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, पाणी पुरवठा विहीर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा व त्याचे सॉफ्टवेअर सरपंच व ग्रामसेवक यांच्या मोबाइलला कनेक्ट करावे, साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी गावात औषध फवारणी करावी, गावासह वाड्या – वस्त्याना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने मुरूम टाकण्यात यावा, ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी याना योग्य नियोजन व पाणी सोडणेबाबत सूचना कराव्यात, स्ट्रेट लाईटचा प्रश्न मार्गी लावावा अशा मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या असून या मूलभूत प्रश्नाबाबत सरपंच व प्रशासनाला जाब विचारला आहे.
यावेळी संतप्त झालेल्या नागरीकाशी सरपंच सौ अर्चना सुभाष भुसाळ, उपसरपंच अनिल सारबंदे यानी संवाद साधत ऐत्या दोन दिवसात या समस्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र नागरीक लेखी आश्वासनावर अडून बसल्याने ग्रामविस्तार अधिकारी ठाकूर याच्यां पुढाकारातून सरपंच व उपसरपंच यानी लेखी आश्वासन दिल्यानतंर हा ‘ हंडा मोर्चा’ शांततेत स्थगित करण्यात आला असला तरी ऐत्या दोन दिवसात पाणी समस्या सोडवली न गेल्यास आक्रमक आदोंलनाचा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यानी दिला आहे.
या ‘हंडा मोर्चा’ प्रसंगी रिपाईचे तालुकाध्यक्ष अशिष शेळके, अँड. रवी शेळके, एकलव्य संघटनेचे अनिल बर्डे तसेच ग्रामविस्तार अधिकारी ठाकूर , सरपंच सौ अर्चना भुसाळ, उपसरपंच अनिल सारबंदे, ग्रामसेवक किशोर मांढरे, ग्रा प सदस्य राजेंद्र भूसाळ , किसन खेमनर , नानासाहेब उंबरकर , विजय शेळके. डॅनी गायकवाड. सनी लोंढे.रोहित शेळके . शुभम शेळके. रवींद्र बी शेळके. विजय भा शेळके. आकाश शेळके. प्रतीक शेळके. अभिषेक शेळके. साहिल शेळके. सतीश शेळके. बाबासाहेब शेळके. सागर शेळके. विनायक शेळके. सौरभ आर शेळके. पप्पू शेळके. जॉन शेळके. अंतोनी शेळके. सखाराम शेळके. प्रशांत शेळके. निशिकांत शेळके. दीपक शेळके. नितीन शेळके. अशोक शेळके. अगुत्सिन शेळके. संपत भुसाळ. सुरेश थोरात. गोपीनाथ भुसावळ . जानकीराम खेमनर. भागवत भुसाळ. राहुल भुसाळ. गणेश भुसाळ. अण्णा सारबंदे.दादू बर्डे. राधू बर्डे. राहुल बर्डे. जालू बर्डे. मनीषा शेळके. अनिता शेळके. रंजना शेळके. आरती शेळके. वर्षा शेळके. सरिता शेळके. जया शेळके. क्लारा लोंढे. कमल गायकवाड. सानिका गायकवाड. मीना शेळके. कांताबाई शेळके. सोनल शेळके. शितल शेळके. वेरोनिका शेळके. सुनिता शेळके. मोनिका बाई शेळके. शालन ब्राह्मणे.
दरम्यान यावेळी मोर्चाला कोणतेही आक्रमक अथवा हिसंक वळण लागू नये यासाठी आश्वीचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे , सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे, पो हे कॉ पारधी , पो गुपनीय आधिकारी विनोद गंभीरे , पो कॉ गायकवाड लेडीज पोलिस सौ दिघे आदिसह पोलीस व होमगार्ड याचां मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी उपस्थित होता.
चौकट
१० महीन्यात पाण्याकरिता दुसऱ्यांदा मोर्चा काढावा लागला असून ही मोठी खेंदाची बाब आहे ग्रामपचायतीच्या पदाधिकारी कर्मचार्यासह पंचायत समिती अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी हे वेळेवर मिळत नाही यांची हुकुमशाही निर्माण झाली की काय ? हा प्रश्न निर्माण झाला आहे .
