संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी व आश्वी येथील बालपण स्कूल मधील विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून गायीचे चित्र साकारत वसूबारस तसेच धनत्रयोदशी, लक्ष्मीपुजन, भाऊबीज, दिपोत्सवातून दिवाळी सण साजरा करत प्रदुषण बचावाकरिता फटाकेमुक्त दिवाळीची शपथ घेतली .

बालपण स्कूल पानोडी व आश्वी च्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्षेनंतर विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकाशकंदील बनवत शाळैत डेकोरेशन केले. विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीची शपथ घेत मी फटाके फोडणार नाही शपथ घेत दिन दिन दिवाळी…. गाई म्हशी ओवाळी बोलत गाईचे पुजन करत वसुबारस साजरी केली. सर्व धान्यांची पुजन करत धनत्रयोदशी साजरी केली. व लक्ष्मीचे पुजन , शाळेचे रजिस्टर याचे पुजन करत लक्ष्मीपुजन साजरे केले. मुलींनी मुलांना ओवाळत भाऊबीज साजरी केली. विद्यार्थ्यांनी वर्गात दिवे लावत दिपोत्सव साजरा केला.

तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यातून विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून भेटकार्ड बनविले.या उपक्रमासाठी बालपण स्कूल पानोडी व आश्वी चे सर्व शिक्षक वर्ग व बालपण च्या प्रमुख सौ.सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून दिवाळी सण साजरा करण्यात आला.
