पानोडी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी वारकरी संप्रादायातील आळंदीला जाणा-या वारकऱ्यांच्या दिंडीचे मोठ्या भक्ती भावाने स्वागत केले .
गेल्या 30 – 35 वर्षांपासून मुंढे परिवाराच्या वतीने व ज्ञानविद्या बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने वर्षभरात आळंदीला जाणार्या 20 वारकरी दिंडीतील भक्तांची सेवा करण्याचे काम करत आहे. शिर्डी ते आळंदी वारी करणा-या श्री साई नवनाथ पायी दिंडी सोहळा डो-हाळे व सर्व भाविक भक्तांचे बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी स्वागत करत चिमुकल्यांनी महाराज व सर्व भक्तांचे दर्शन घेत महाराजांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत दिंडीचा आगळावेगळा अनुभव घेतला.
महाराजांनी बालवयातच चिमुकल्यांना भक्तीमार्गाची असलेल्या आवडीबद्दल कौतुक केले. तर चिमुकल्यांनी भजन गात,रिगण , फुगडी खेळत दिंडी अनुभव घेतला. दिंडीच्या वतीने बालपण स्कूल पानोडीच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. बालपण स्कूलच्या प्रमुख सौ.सोनाली मुंढे यांनी आयोजित केलेल्या उपक्रमातून व शिक्षिका शिंदे व हजारे यांनी यांनी नियोजन केले.
Post Views: 852
