आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकिय व व्यापारी दृष्टीने प्रतिष्ठित व चौफुलीवरचे असणाऱ्या आश्वी बु॥ मध्ये मुख्य रस्त्यावर हॉटेल्स् सुरु करुन बेकायदेशिरपणे दारू विक्रीचा सुळसुळाट होत असतानाही पोलिसांचा याकडे कानाडोळा का ? होत असल्याची चर्चा होवू लागली आहे
तालुक्यापासून २५ ते २६ कि मी वर असणाऱ्या चौफुलीच्या गावातील शाळा व मुख्य रस्त्या परिसरात बेकायदेशिरपणे हॉटेल खुले करुन दारु विक्रीचा सुळसुळाट होताना दिसत आहे . यांचा त्रास शालेय विदयार्थी , आजू बाजूच्या गावामधील ग्रामस्थ व प्रवाशांना होताना दिसत असतानाही अनेकादा तक्रारी होवूनही यांच्यावर कुठली कारवाई झाली नसल्यानेचं दिवसाढवळ्या दारू विक्री होत असून ही दारू डुबली केट अथवा ओरीजल यांचीही कोणाला जाणिव होताना दिसत नाही पोलिसांचा अनेकदा राऊट होत मात्र याकडे दुर्लक्षचं दिसून येत आहे .
कोरोनाचा पासून लोक छोट्या – मोठ्या व्यवसायाकडे वळाल्याचे दिसून येत आहे . कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाले जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व काही ठप्प झाले . कोरोनाची एक दहशत निर्माण झाली असता लोक घराच्या बाहेर फिरण्यास घाबरू लागले मात्र अशातचं दारु ही डब्बल , तिब्बल अशा चढत्या भावाने आश्वी व परिसरात विक्री झाल्याचे दिसून आले . याकडे पोलिसांचा दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले . सर्वकाही ठप्प झाले आर्थिक व्यवहार मंदावले , गोरगरिब , मजूरांना खाणे पिण्याचे वांन्दे झाले मात्र दारु विक्रेते मालामाल होत गेले . ग्रामपचायत प्रशासनने कोरोनाच्या लॉकडाऊन काळात छोटया – मोठया व्यवसाय बंद केले तर डिन्सीटींगचे नियम लावले , मात्र दारू विक्रेताना रान मोकळेचं दिसले होते बेकायदेशिर दारू विक्री ही जोमात झाल्याचे दिसून आली दारुची विक्री ही खिशाच्या माध्यमातून गरम झाली यांची कल्पना लोकांना आलीचं नाही .
त्याचं धरर्तीवर संध्या दारु विक्रीचा नवा ट्रेन आला हॉटेल सुरु करुन बेकायदेशिरपणे दारु विक्री करणे आवती – भोवती अनेक व्यवसाय उभे असतानाही याबाबत उघडपणे कोणीही वाच्यता करताना दिसत असून निमुठपणे त्रास सहन करत आहे गावामुळे आजू बाजूच्या अनेक गावामधून लोकांची येना त्या कारणाने ये – जा चालू असते यांची तमा न बाळगता दारू विक्रेतांना असा कोणताचं कायदा लागू झाला नाही त्यांनी मात्र राजरुसपणे दारु विक्री केल्याचे दिसून येत आहे . दारु मुळे अनेकांचे कुटुब उध्वस्त झाले मात्र बेकायदेशिरपणे दारु विक्रेते मालामाल झाले आहेत . ग्रामपचायतीच्या ग्रामसभेतून अनेकदा दारु बंदी ठराव करण्यात आले मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही उलट दारु विक्री फोफावतचं गेली या बेकायदेशिरपणे दारु विक्रीतेचा त्वरीत बदोबस्त करावा अशी मागणी होताना दिसत आहे .
चौकट
आश्वी बु ॥ मधील पाटबंधारे विश्रामगृह , कार्यालय , मंगल कार्यालय , पेट्रोल पंप आदीसह छोट्या – मोठ्या व्यवसायाचे जाळे निर्माण झाले असताना तेथेचं हॉटेल सुरु होवून बेकायदेशिरपणे दारु विक्रीचा धुमधडका सुरु असल्याचे दिसून येत आहे यात हॉटेल समोर महसूल मंत्र्याचे अनेक कार्यक्रम झाली मात्र याचा अनेकांना त्रास ही झाला मात्र याकडे पोलिसाचे दुर्लक्ष का ? अशी चर्चा होवू लागली आहे .
