संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह १७ डिसेंबर ला श्रीक्षेत्र वरवंडी या पुण्यभूमीत  सुरू होत असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून या वर्षी वरवंडी ग्रामस्थांनी या फिरत्या नारळी  सप्ताहाची  जोरदार तयारी केली आहे

 

रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ह भ प महंत मठाधिपती गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असुन या मिरवणूकीने सप्ताहाची सुरुवात होणार आहे . 

 

 श्रीक्षेत्र वरवंडी या पुण्यभूमीत 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या  सप्ताहाचे हे 15 वे वर्ष आहे. सप्ताहासाठी भोसले परिवाराने जागा उपलब्ध करून दिली  या ठिकाणी जवळपास १५ एकर जागेत या भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन केले आहे 

 

यासाठी २५० बाय १५० असा कीर्तन भव्य मंडप उभारण्यात आला आहे भोजनासाठी १०० बाय १०० असा मंडप उभारण्यात आला भजन मंडप, महाराजांसाठी कुटिया तसेच, साधूंसंत विश्रांती मंडप, यज्ञ मंडप, घटस्थापना मंडप , प्रहारेकरी मंडप तयार झाले असून यासाठी अनिल लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली 50 मजूर गेली वीस दिवसापासून रात्रंदिवस परिश्रम घेत आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गावात बॅनर पोस्टर लावण्यासाठी हजारो भक्त परिश्रम घेत आहे या सप्ताह अनेक मान्यवर भेटी देत असतात साधू संतांचे दर्शन होते लाखो भाविक सात दिवस आमटी भाकरीचा प्रसाद घेतात तसेच दररोज पहाटे काकडा, सकाळी ज्ञानेश्वरी, पारायण दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि रोज रात्री सात ते नऊ या वेळेत  नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे  तसेच

 

 रविवार दिनांक २४ रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत महंत दत्तगिरी महाराज  यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल 

 

दिवसेंदिवस या सप्ताह भाविकांची गर्दी होत वाढत आहे तर सप्ताहात हजारो स्वयंसेवक असणार आहे या स्वयंसेवकांद्वारे सप्ताहात अन्नदानाच्या ठिकाणी वरवंडी चौधरवाडी कुंभारवाडी या ठिकाणचे  भाविक,  विविध हायस्कूल,शाळा, तरुण-तरुणी तसेच   बचत गटाच्या महिला आदी भाविक सेवा  करणार  आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed