संगमनेर । झुंजार न्यूज

 

अतिशय सन्मानाचा आणि मानाचा समजला जाणारा नीती आयोग संलग्नित जेबी इंडियाचा इंडियन ग्रुप आयकॉन पुरस्कार २०२३ हा तालुक्यातील बिरेवाडी-साकूर येथील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल ढेंबरे यांना नुकताच जाहीर असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम राहुल ढेंबरे करत आहेत.

गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम,नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान,विजेसंदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम,छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी करणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि दळणवळण विषयक प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा,प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे आयोजन,ग्रामीण भागातील पाणी,रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमी अग्रेसर भूमिके बरोबरच जिल्हा परिषद,राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विभागातील रस्त्यांच्या खड्डेमुक्तीसाठीचे आमरण उपोषण.कोविड महामारीतही रुग्ण व नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत नातेवाईक आणि रुग्णांना आजारावर मात करण्यासाठी सामाजिक बांधीलकी जपत बळ देण्याचे काम,मराठा आरक्षण विषयी स्पष्ट आणि आग्रही भुमिका,जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम करण्याची पद्धती यामुळेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील राहुल ढेंबरे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

या वर्षाच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री.ढेबरे यांना रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी आग्रा येथे देशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार ‌एस.पी.सिंग बघेल यांच्या हस्ते तसेच उत्तर प्रदेश भुमी विकास बँकेचे संचालक शाम बडोरिया यांचे प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed