बाभळेश्वर | झुंजार न्यूज

एका स्विप्ट गाडीच्या धडकल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाला. राहाता तालुक्यातील श्रीरामपूर – बाभळेश्वर रस्त्यावरील इग्लीश स्कूलच्या बाजूस ही घटना घडली. भेदरलेल्या अवस्थेत रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याचे डोके धावत्या गाडीच्या पुढचे भागास बिबट्या आदळल्याने तो जागेचं गतप्राण झाला. तर गाडी स्वाराचा तेथून पसार झाला . ही घटना गुरुवारी रात्री ११ ते १२ वाजल्याच्या दरम्यान घडल्याचे माहिती मिळाली .

 

अज्ञात गाडी स्वार हा २१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान लोणी-बाभळेश्वर रस्त्यावरून जात होता. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उसाच्या शेतात असलेला बिबट्या अचानक रस्त्यावर आला आणि त्या अज्ञात गाडी वेगामुळे बिबट्या गाडीला आदळून रस्त्याच्या कडेला बिबट्या गतप्राण झाला . दरम्यान, ही बातमी बाभळेश्वर परिसरात वेगाने पसरली बघ्यांची घटनास्थळी एकच गर्दी झाली. मात्र, या प्रकाराने घाबरलेल्या अज्ञात गाडी स्वाराने तेथून धूम ठोकली.
 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed