पालकमंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत राहुरीत ऐतिहासिक सोहळा

राहुरी । झुंझार न्यूज

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा प्रथमच भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम राहुरी तालुक्यातील कनगर येथे गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिली आहे.

या जंगी सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील , माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अक्षय कर्डिले यांचीही प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. डॉ. रामदास आठवले यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी आणि त्यांची तिसऱ्यांदा झालेली राज्यसभा निवड, याचा गौरव करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या भव्य सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाला रिपाईचे राज्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्याचे उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, राजाभाऊ कापसे, विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, सुभाषराव त्रिभुवन , कैलास शेजवळ, भाऊसाहेब पगारे, राजन ब्राह्मणे, रमेश शिरकांडे, चंद्रकांत सरोदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महिला आघाडीच्या रमाताई धीवर, जिल्हाध्यक्षा सीमाताई बोरुडे, स्नेहल दिवे, रुपाली सोनवणे , वैशाली सोनवणे यांसह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सत्काराच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. कोपरगावचे अनिल ननवरे, राहुरीचे विलास साळवे, श्रीरामपूरचे सुनील शिरसाट, नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे, राहाता तालुकाध्यक्ष धनुभाऊ निकाळे, करण कोळगे, अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे, संगमनेरचे आशिष शेळके , शिर्डी शहराध्यक्ष नानाभाऊ त्रिभुवन यांच्यासह अनेक मान्यवर आपापल्या समर्थकांसह उपस्थित राहणार आहेत.


नेवासा तालुक्यातून सुशील धायजे, पप्पू इंगळे, विजय राजगुरू, संतोष मोरे, संजय बनसोडे, नितीन भालेराव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा कनगरकडे रवाना होणार आहे. मुस्लिम आघाडीचे पप्पूभाई सय्यद, युनूस भाई शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे .

डॉ. रामदास आठवले यांच्या निवडीमुळे दलित, शोषित आणि वंचित घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा सत्कार सोहळा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात लक्षवेधी ठरणार आहे. या सोहळ्याला जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आठवले प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विजयराव खरात, कैलास कासार, मधुकर सोनवणे, योगेश मुन्तोडे, बाळासाहेब कदम , नानासाहेब कदम , विजय अडांगळे, शरद जमधडे , जर्नाधन साळवे , प्रविण ब्राम्हणे , सिद्धार्थ खरात यांसह जिल्हा व तालुका पातळीवरील शेकडो पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

नियोजनासाठी शनिवारी महत्त्वाची बैठक

या भव्य सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात एक महत्त्वाची बैठक श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी दिनांक ८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नियोजनाचा अंतिम आढावा घेतला जाणार आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *