आ अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरी सहाय्यता कक्ष सुरू

नागरिकांसाठी मदतीचा नवा आधार केंद्र

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर शहरात शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या जन संपर्क कार्यालयात ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा’चा भव्य शुभारंभ उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना त्यांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडवण्या साठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये अनेक वेळा विविध प्रक्रियांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना शासकीय योजनांची अचूक माहिती, अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, तसेच समस्या सोडवण्यासाठी योग्य त्या विभागाशी समन्वय साधून त्वरित मदत मिळावी, या उद्देशाने या नागरि सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

उद्घाटन सोहळ्यास नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे, सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ, मंगल खताळ, राहुल खताळ, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, तालुका संघटक मंजा बापू साळवे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, महिला उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ नगरसेविका साक्षी सूर्यवंशी संगीता पुंड सपना जाधव युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, , , आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, शशांक नामन, अक्षय वर्पे ऋषिकेश मुळे राहुल सोमवंशी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला शिवसैनिक, पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून, भविष्यातही अशा नागरिकाभिमुख योजना राबवण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा सहाय्यता कक्ष एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

नागरिकांसाठी मदतीचा नवा आधार….

 

 

विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार असून, प्रशासन आणि जनतेमधील दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत व सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन त्यांना शासनाच्या सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहे.

…………………………………….

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed