संगमनेर । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील बाळासाहेब सगाजी शेळके (व्हा. चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी उबरी बाळापुर ) यांचे चिरंजीव अॅड रविंद्र तसेच शिबलापूर येथील मुरलीधर दगडू मुंन्तोडे यांची कन्या चि.सौ.का. मयुरी यांचा शुभविवाह निमगांव जाळी येथील समृद्धी मंगल कार्यालयात मोठया थाटामाटात संप्रन्न झाला .

 

अॅड रविंद्र हे सामाजिक व वकीली क्षेत्रातील तरुण तडफदार असणारे व्यक्तीमत्व होय . तर तालुक्यातील पुर्व भागातील झरेकाठी , दाढ , खळी , पिंप्री लौकी अजमपूर , चणेगांव येथे कामगार तलाठी म्हणून कार्यारत असणाऱ्या सौ मयुरी यांचा विवाह सोहळा उत्साही व मनोरंजन वातावरणात फादर सायमन शिंनगारे , फादर प्रशांत शहाराव , फादर जेम्स थोरात , फादर संपत भोसले ,फादर अब्राहम,फादर ख्रिस्तफोर शेळके या धर्मगुरुनी विधीवंत प्रार्थना करुन लग्न लावले .

या विवाह सोहळ्यातील वधू वरांना आशिर्वाद देण्यासाठी जेष्ठ वकील अॅड रामदास शेजूळ , पचायत समिती माजी सदस्य अॅड पोपटराव वाणी , बार असोशिएन अध्यक्ष अॅ ड उदयसिंग ढोमसे , प्रवरा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ भूसाळ , विलासशेठ उंबरकर , प स माजी सदस्य सरुनाथ उंबरकर , रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , युवक जिल्हाध्यक्ष पप्पुभाऊ बनसोडे ,रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , रिपाई संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार , विजुभाऊ खरात .एकलव्य आदिवाशी संघटना तालुकाध्यक्ष अनिल बर्डे , संगमनेर तहसीलदार धीरज माजरे , भूमी अभिलेख उपअधीक्षक पवार , उल्हासराव गायकवाड , पत्रकार राजेंश गायकवाड , विकास गायकवाड , अनुप कदम , अॅड अनिल भोसले , ॲड. प्रतीक्षा शेळके , मेजर किरण विंचू सचिन सोनवणे , आश्वी बु ॥ माजी संरपच महेश गायकवाड ग्रा प सदस्य विजय शेळके आदीसह राजकीय , सामाजिक , व्यवसायिक , वकीली , महसूल विभागीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed